Share

Narayan Rane | “…असा चाफा फक्त मातोश्रींवर”; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Published On: 

मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत आरोप, टोलेबाजी सुरू असते. अशातच भाजप (BJP) पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधाला आहे.

काय म्हणाले नारायण राणे ?

उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

नारायण राणे म्हणाले की, आशिष शेलार (Ashish Shelar) हे एक कवी पण आहेत. ते बोलता बोलता चाफा उगवेना, चाफा फुलेना असं बोलून गेले. पण उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही.

तसेच, त्या कार्यक्रमाच्यावेळी नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांना ‘पुरूषार्थ’ हे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले. हे पुस्तक मला नाही उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे, असं म्हणत यावरूनही उद्धव ठाकरेंना राणेंनी लक्ष्य केलं.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!