Share

Car Update | ‘या’ कार मध्ये आहेत सर्वोत्तम सनरुफ फिचर

Published On: 

🕒 1 min read

आजकाल बाजारामध्ये नवनवीन कार लाँच होत आहेत. प्रत्येक कारमध्ये एकापेक्षा एक फिचर्स असतात. हे फिचर्स सुध्दा लोकांना पण खूप आवडतात. यामध्ये एक सर्वात लोकप्रिय फीचर म्हणजे सनरुफ. भारतीय बाजारात या फिचरसह अनेक कार उपलब्ध आहेत. सनरुफमुळे कार अजून आकर्षक दिसते. पण सनरुफसोबत येणाऱ्या कार बाजारात थोड्या महान मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही कार बद्दल माहिती सांगणार आहोत ज्यामध्ये सनरुफ फिचर सोबत त्यांची किंमत देखील कमी आहे.

Maruti Brezza मारुती ब्रेझा

मारुती सुझुकी चे Maruti Brezza (मारुती ब्रेझा) हे मॉडेल सनरुफसह उपलब्ध आहे. या कारमध्ये सनरुफ बरोबर ब्रँड न्यू ड्युअल-एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, रियर सिग्नेचर एलईडी टेल लॅम्प, फ्लॅट बॉटम टेलिस्कोपिक स्टीयरिंग, क्रिस्टल ब्लॉक डीआरएल इत्यादी फिचर्स आहेत. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 7.99 लाख रुपये आहे तर तिचे टॉप मॉडेल 13.96 लाख रुपये एक्स-शोरुम किमतीत उपलब्ध आहे.

Tata Nexon

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स देखील आपल्या बेस्ट सनरूफ फीचरसह बाजारात उपलब्ध आहे. टाटाच्या Tata Nexon इलेक्ट्रिक SUV मध्ये हे आकर्षक फीचर उपलब्ध आहे. यामध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्ट, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प, 12V रीअर पॉवर सॉकेट, मल्टी ड्राईव्ह मोड, शार्क फिन अँटेना, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ग्लोव्ह बॉक्स, रिअर एसी इत्यादी फिचर्स आहेत. या SUV ची एक्स-शोरुम किंमत 7.60 लाख ते 14.08 लाख इतकी आहे.

Mahindra XUV300

महिंद्राची Mahindra XUV300 ही SUV सुध्दा आकर्षक आणि कमी किमतीत समरूफ फीचरसह बाजारात उपलब्ध आहे. आकर्षक सनरुफसह या कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट मिळते, जे Android Auto आणि Apple CarPlay, रेन सेन्सिंग वायपर्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ऑटो एसी इत्यादी फिचर्स आहेत. या SUV ची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 9.99 लाख रुपये इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Cars And Bike

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या