🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) त्यांच्या डायलाॅगबाजी मुळे चर्चेत असतात. अशातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांना दसरा मेळावा बाबत देखील विचारण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली.
शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया :
पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर जावं, तर बाळासाहेबांचा कडवा विचार ऐकणाऱ्यांनी BKC मैदानावर यावं, असं शहाजीबापू पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला ऐतिहासिक प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा देखील पाटलांनी केला आहे.
सांगोल्यातून 15 हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी बिकेसी मैदानावर जाणार असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी टाईम मॅनेजमेंटची योजना केली असल्याचं समोर आलं आहे.
अजित पवार यांना लगावला टोला :
अजित पवारांना आता का काहीच काम उरलं नाही, ते विरोधी पक्षनेते झालेत मात्र, ते कायम सत्तेत राहत असल्यानं नेमकं काय करायचे हेच त्यांना कळत नाहीये, असं शहाजी पाटील म्हणाले. एवढंच नाही तर अजितदादांनी आता फक्त शिंदे, ठाकरे, इंदोरीकर महाराजांची भाषणे ऐकावीत असा टोला शहाजीबापू पाटलांनी अजित पवारांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | “ही महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही भाषण करताना…”, सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
- Shahajibapu Patil | “अजित पवारांना आता काम उरलेलं नाही, त्यांनी फक्त शिंदे, ठाकरे, इंदोरीकरांची भाषणं ऐकावीत”, शहाजीबापू पाटलांचा हल्लाबोल
- Nilesh Rane | “उद्धव ठाकरे बोगस माणूस, बाळासाहेबांची सेना रसातळाला नेली” ; भाजप नेत्याची टीका
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा मास्टर माईंड ‘टाईम मॅनेजमेंट’, उद्धव ठाकरेंना ‘असा’ देणार शह
- Jawa 42 Bobber New Launch | जावा (Jawa) ची 42 Bobber लाँच, काय आहे या बाईकची खासियत जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
