Share

Amit Shah | “अमित शहा सत्तेतील प्रभावशाली नेत्यांपैकी एक..” राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सत्तेत असलेल्या प्रभावशाली नेत्यांपैकी गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah) हे एक प्रभावशाली नेते असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीतील नेत्याने केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Dr. Amol Kolhe ) यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केलं आहे.

डॉ.अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीचे एक स्पष्ट वक्ते अशी ओळख आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. मात्र त्यांच्या या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमोल कोल्हेंचा ‘शिवप्रताप गरूड झेप’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यासंदर्भात त्यांनी अमित शहांची भेट घेतली असल्याचं सांगितलं आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी राजकीय सीमोल्लंघन केलं असल्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांनी यावर देखील भाष्य केलं आहे.

राजकारणात संवाद हा कायम असायला हवा. निवडणुकीत तुम्ही राजकीय व्यासपीठावर असता. धोरण पटत नसेल तर विरोधकांच्या भूमिकेत असता. पण इतर वेळी तुमचा संवाद कायम हवा. त्यामुळे या भेटीला कोणीही राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचं डॉ.अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!