🕒 1 min read
औरंगाबादचे पालकमंत्री तसेच शिंदे गटातील नेते संदिपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटावर जोरदार टीका केली होती. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे गटातील अनेक नेत्यांवर त्यांनी आरोप देखील केले होते. यालाच आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर केलं आहे.
मी आता मैदानात उतरलोय, काय होईल ते बघून घेऊ, असे थेट आव्हान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संदिपान भुमरे यांना दिले आहे. तसेच मी एकनाथ शिंदेंकडून 20 लाख आणले हे सिद्ध करा अन्यथा सुळावर चढा असेही आव्हान त्यांनी दिले आहे.
संदिपान भुमरेने कोणाला मोठं होऊ दिलं नाही. सगळा खोटरडापणा लावला आहे. मी त्याला मोठ केल त्याने एक झेंडा देखील लावला नाही, असेही खैरे म्हणाले. हे सर्व आमदार आगामी निवडणुकीत पडतील मी ठामपणे सांगतो असेही खैरे यांनी ठासून सांगितलं आहे. तसेच पालकमंत्री झाल्यानंतर संदिपान भुमरे यांच्या प्रत्येक निर्णयावर माझ लक्ष आहे असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- Car Update | ‘या’ कार मध्ये आहेत सर्वोत्तम सनरुफ फिचर
- Shahajibapu Patil | “पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा…”, शहाजीबापू पाटलांचा इशारा
- Amit Shah | “अमित शहा सत्तेतील प्रभावशाली नेत्यांपैकी एक..” राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य
- Natural Calamity | केदारनाथ धामचे चित्तथरारक दृश्य आले समोर, मंदिराजवळील बर्फाचा डोंगर कोसळला
- Supriya Sule | “ही महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही भाषण करताना…”, सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
