मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणजे ‘म्याव म्याव’ भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानभवनाच्या पायरीवर बसलेले असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनात प्रवेश करत असताना त्यांच्याकडे पाहून म्याव म्याव असा आवाज काढला. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जो वाद सुरु झाला तो अद्यापही शमलेला नाही.
आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यावर ताशेरे ओढले आहेत. नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढण्यावरून नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मांजराचा आवाज कोण काढते? ज्यामुळे चिडले. आदित्य ठाकरेंचा मांजरेचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्याव केले. आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का? ते तसं बोलतात का? मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा, असे नारायण राणे म्हणाले आहेत.
नितेश राणेंनी म्याव म्याव आवाज काढला याबाबत पत्रकार प्रश्न विचारत होते त्यावेळी नितेश राणेंच्या या कृत्यावर अजित पवार सभागृहामध्ये बोलत होते, असं पत्रकार म्हणताच नारायण राणे लगेचच उत्तरले की, कोण अजित पवार? मी नाही ओळखत कोणत्या अजित पवार, असे म्हणत नारायण राणे अजित पवारांचा एकेरी उल्लेख केला आणि पत्रकारांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या
- आपण कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही; अजित पवारांनी आमदारांना खडसावलं
- रुईकर कुटूंबियांना शिवसेनेतर्फे ५ लाखाची मदत; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली कुटुंबियांची भेट!
- असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये; खडसे हल्ला प्रकरणी चाकणकरांची प्रतिक्रिया
- “…तरीही राज्यपाल अडथळा आणत असतील तर त्यांच्यावर दबाव आहे”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- गुंडांनी भगवी वस्त्र धारण केल्यास त्यांना संत म्हणता येणार नाही; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
