Share

कोंबड्यांना मांजर करून कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांची फटाकेबाजी

Published On: 

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू आहे. प्राण्याची चित्रे ट्विटरवर पोस्ट करून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला आहे. या वादात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेतली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनामध्ये जात असताना नितेश राणेंनी म्याव म्याव आवाज केला. त्यावर नवाब मलिकांनी त्याला उत्तर देण्यासाठी कोंबडीच्या धडाला मांजराचे तोंड लावल्याने मोठा वाद सुरु झाला. त्यावरुन लगेच नितेश राणेंनी डुकराचा फोटो एडिट करुन नवाब मलिकांवर निशाणा साधला. याच वादावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajitb Pawar)  यांनी नितेश राणेंना फटकारले आहे.

अजित पवार आज रत्नागिरी होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांना नितेश राणे-नवाब मलिक वादावरही छेडण्यात आले असता अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने नितेश राणेंना फटकारलं आहे. ‘कोंबड्यांना मांजर केलं जात असल्याचं मी टीव्हीवर पाहत आहे. अशाने कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का? कोकणाचा विकास होणार आहे का?’ असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!