Share

गुंडांनी भगवी वस्त्र धारण केल्यास त्यांना संत म्हणता येणार नाही; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरताना गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे कौतुक केले आहे. या प्रकरणामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी निराजी व्यक्त केली आहे.

कालीचरण महाराज यांच्या वक्तव्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी तातडीने एफआयआर दाखल करुन घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणामध्ये दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. अशी वक्तव्य करणाऱ्यांना संत नाही तर गुंड म्हणावं लागेल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एखाद्या कटाप्रमाणे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकरणांमध्ये आयोजकांनाही खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगताना या चौकशीनंतर संबंधित प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा शब्द भूपेश बघेल यांनी दिला आहे.

कार्यक्रमाच्या आयोजकांनी या कार्यक्रमाचे संरक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती केली होती त्यामध्ये महंत राम सुंदर दास यांचाही समावेश होता. राम सुंदर दास हे भाजपचे आमदार आहेत. सनातन धर्मासंदर्भात चर्चा घडवून आणली जाणार असल्याचे सांगण्यात आलेले त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती, असेही भूपेश बघेल यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!