Share

‘म्याव म्याव चा आवाज काढणारे आज मांजरासारखे लपून बसलेत’, नितेश राणेंवर केसरकरांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. याप्रकरणी भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर संशयाची टांगती तलवार असून २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी त्यांची अर्धा तास चौकशी केली. आता नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी आज(२८ डिसें.)दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी नितेश राणेंवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद असतांना केसरकर म्हणाले की,’प्रत्येक गुन्हेगार कायदा आणि पोलिसांना घाबरत असतो. कोणी गुन्हा केला हे मला माहिती नाही. पण जो दुसऱ्याला चिडवतो आणि म्याव म्याव करत असतो त्याच्यावर तेच करण्याची परिस्थती दैव आपल्यावर आणतं ही देखील वस्तुस्थिती आहे’, असे ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’जे लोक दुसऱ्यांना चिडवत असतात, त्यांच्यावर अशी वेळ ईश्वर कधी ना कधी आणत असतो. ते मांजराची नक्कल करत होते आणि आता तेच मांजरासारखे लपून बसले आहेत ही वस्तुस्थिती आहे. ते वाघाला घाबरतात की कोर्टाला हे माहिती नाही, पण घाबरत आहेत ही वस्तुस्थिती आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!