Share

असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये; खडसे हल्ला प्रकरणी चाकणकरांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाची किरकोळ तोडफोड झाली असून, रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी गंभीर दखल घेतली आहे. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

रोहिणी खडसे या हल्ल्यामधून सुखरूप बचावल्या आहेत. वाहनाचे नुकसान झाले. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते. हल्ला करणारे कोणीही असो निर्दोष सुटता कामा नये, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करून, त्यांना अटक करावे अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

दरम्यान, रोहिणी खडसेंवर झालेल्या भ्याड हल्ल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जोर लावून धरली आहे. रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला. रात्रीच्या अंधारात हा हल्ला कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराने पळ काढल्यामुळे त्याला पकडण्यात यश आलेले नाही. मात्र शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  आणि रोहिणी खडसे यांच्यातील वाद ताजा असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!