🕒 1 min read
मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North Assembly By-Election) भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भातच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre) यांनी ट्वीट केले आहे.
“महाविकास आघाडी श्रीमती जयश्री जाधव ताईसोबत खंबीरपणे उभी राहिली. मग ती माऊली विजयी झाल्याशिवाय राहीलच कशी हो. असेच एकदिलाने, ताकतीने उभे रहा नक्कीच भाजपचा भस्मासुर नस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही.”, असे ट्वीट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे.
स्वाभिमानी कोल्हपुर मतदार,आणि खऱ्या चांगल्या नीतिमत्ताचे महाविकास आघाडीने
श्रीमती जयश्री जाधव ताईच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली.मग ती माऊली विजयी झाल्याशिवाय राहीलच कशी हो.
असेच एकदिलाने,ताकतीने उभे रहा
नक्कीच भाजपचा भस्मासुर नस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही#अभिनंदन #सर्वांचे— Rupali patil thombare (@Rupalispeak) April 16, 2022
दरम्यान सतेज पाटील यांचा प्रभाव असलेल्या भागात पोटनिवडणूक होत असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जयश्री जाधव यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे प्रचारसभा घेतली होती. त्यात त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर स्वार्थासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांसाठी त्यांनी गदा हातात घेतली असती”, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा
- “राष्ट्रवादीच्या रिमोटवर काँग्रेसचा सेल टाकून शिवसेनेचा गेम सुरु”, केशव उपाध्येंचा खोचक टोला
- “सत्तेपुढे शिवसेनेचे हिंदुत्व गौण”, राष्ट्रवादीच्या ‘त्या’ निर्णयावरून केशव उपाध्येंचे टीकास्त्र
- एवढं धडधडीत खोटं बोलण्याची ‘ऊर्जा’ कुठून मिळते?; भातखळकरांचा नितीन राऊत यांना टोला
- “अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब…”, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
