Share

Dhananjay Mahadik | “आता राजकरणात महाभारत होणार…”, धनंजय महाडिकांचं सतेज पाटलांना आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: धनंजय महाडिक यांचं खासदारकीच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन झालं आहे. यानंतर कोल्हापूरचं राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते विधानसभा आणि गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा विजय झाला. यामुळे कोल्हापूरमध्ये एकतर्फी राजकारण सुरू असल्याचं चित्र दिसत आहे.

धनंजय महाडिकांचं सतीश पाटलांना आव्हानः

यादरम्यान धनंजय पाटलांनी आमचं ठरलंय, असं केलेलं विधान चर्चेत आलं होतं. मात्र सर्व काही उलट झाल्यामुळे माझा घात झाल्याचं धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केल आहे. 20 ऑगस्ट रोजी राज्यभरात मोठ्या जल्लोष दहीहंडीचा उत्सव साजरा झाला. यावेळी धनंजय माहाडिक यांनी सतेज पाटलांना थेट आव्हान दिलं आहे. यावेळी इथून पुढे राजकारणात महाभारत होणार असल्याचं धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कोल्हापूरच्या राजकारणात कोण सरस राहणार हे पाहावं लागणार आहे.

एकत्र येऊन राजकरणाचं चित्र बदलणारः

स्थानिक स्वराज्य संस्था पासून ते देशाच्या राजकारणात कोल्हापूरची एक वेगळीच ओकळख आहे. मात्र आता जिल्ह्यातील राजकारणाचं चित्र बदलण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा महाडिक यांनी दिला आहे. एवढंच नाही तर भाजप आणि मित्र पक्ष मिळून हे सर्व करणार असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे गट देखील सोबत असणार, असं देखील याचा अर्थ होतो.

कोल्हापूरचा इतिहासः

दहीहंडी कार्यक्रम दिवशी धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरकरांसमोर अडीच वर्षाचा इतिहास रचला. यावेळी विरोधकांकडून खोट्या केसेस टाकून अभिमन्यू सारखं घेरलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या अडीच वर्षातील घडामोडीचा साक्षीदार झालात आता भविष्यकाळ आपलाच म्हणत त्यांनी थेट आव्हान दिलं आहे. तसेच त्यांच्यावर आणि कोल्हापूरकरांवर गेल्या अडीच वर्षाच्या काळात अन्याय झाला, मात्र, आता काळ बदलत असल्याने वाईटचा नाश होतो, असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!