🕒 1 min read
मुंबई: भक्ती, शक्ती, युक्ती, कर्म आणि बुद्धीचा संगम म्हणजे श्री हनुमान! द्रोणागिरी पर्वत उचलण्याची अफाट ताकद असूनही त्याचा गैरवापर न करता दोन गटात समेट घडवून आणण्यासाठी त्यांनी दूत म्हणून नेहमीच प्रयत्न केला. हनुमानरायांची भक्ती वेळेप्रमाणे कधीही बदलली नाही तर ती एकनिष्ठ होती. असे राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार (rohit pawar) यांनी म्हटले आहे. आज (१६ एप्रिल ) हनुमान जयंती निमित्त त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून न घेता कर्म हाच धर्म मानून त्यांनी कायम निरपेक्ष सेवा केली. धर्माचा वापर स्वार्थासाठी न करता, गटातटात वाद न लावता त्यांनी शांतीदूत म्हणून काम केलं. आज ते आपल्यात असते तर वैयक्तिक स्वार्थासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांसाठी त्यांनी गदा हातात घेतली असती. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष विरोधकांवर निशाणा साधला.
भक्ती, शक्ती, युक्ती, कर्म आणि बुद्धीचा संगम म्हणजे श्री हनुमान! द्रोणागिरी पर्वत उचलण्याची अफाट ताकद असूनही त्याचा गैरवापर न करता दोन गटात समेट घडवून आणण्यासाठी त्यांनी दूत म्हणून नेहमीच प्रयत्न केला. हनुमानरायांची भक्ती वेळेप्रमाणे कधीही बदलली नाही तर ती एकनिष्ठ होती. pic.twitter.com/N4eQ05rhCX
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 16, 2022
समाजात तेढ निर्माण न करता अडचणीतील सामान्य माणसाला मदत करणं आणि दुर्बलाचं संरक्षण करणं, हीच खरी हनुमान भक्ती आहे, असं मला वाटतं. आज हनुमान जयंतीनिमित्त आपण सर्वजण अशी भक्ती करूयात! जय बजरंग बली! असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “राष्ट्रवादीच्या रिमोटवर काँग्रेसचा सेल टाकून शिवसेनेचा गेम सुरु”, केशव उपाध्येंचा खोचक टोला
- “सत्तेपुढे शिवसेनेचे हिंदुत्व गौण”, राष्ट्रवादीच्या ‘त्या’ निर्णयावरून केशव उपाध्येंचे टीकास्त्र
- एवढं धडधडीत खोटं बोलण्याची ‘ऊर्जा’ कुठून मिळते?; भातखळकरांचा नितीन राऊत यांना टोला
- “अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब…”, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला
- IPL 2022 : सनरायझर्स हैदराबाद कडून विजयाची हॅट्ट्रिक! KKRचा ७ विकेट्सने पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
