मुंबई: शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात, मी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर इतकी टीका केली तरी त्यांनीच मला मंत्री बनवलं. याचा अर्थ जसं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं तसं शिवसेनेचे मंत्री कोण असलेले याची यादी पवारांनी ठरवली होती. सेक्युलर विचारधारेचा सरकार यावर महाविकास आघाडीची स्थापना झाली, असं शरद पवार जाहीरपणे बोलतात. त्यामुळे किमान समान कार्यक्रम हे थोतांड असल्याचं सिद्ध झालं आहे. त्याच बरोबर शिवसेनेच्या ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे. अशी टीका भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या रिमोटवर काँग्रेसचा सेल टाकून शिवसेनेचा गेम सुरू आहे. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकांची भावनिक दिशाभूल करत आहेत. उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसने हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी घेणार असे जाहीर करूनही त्यावर मौन बाळगणाऱ्या शिवसेनेची बिकट अवस्था बाळासाहेब ठाकरे असते तर कधीच झाली नसती. असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
https://www.facebook.com/234379736735715/posts/2064157330424604/
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत मोठी भुमिक घेतली आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. तर यालाच प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज (१६ एप्रिल) संध्याकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यावरूनच केशव उपाध्ये यांनी थेट शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “सत्तेपुढे शिवसेनेचे हिंदुत्व गौण”, राष्ट्रवादीच्या ‘त्या’ निर्णयावरून केशव उपाध्येंचे टीकास्त्र
- एवढं धडधडीत खोटं बोलण्याची ‘ऊर्जा’ कुठून मिळते?; भातखळकरांचा नितीन राऊत यांना टोला
- “अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब…”, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला
- IPL 2022 : सनरायझर्स हैदराबाद कडून विजयाची हॅट्ट्रिक! KKRचा ७ विकेट्सने पराभव
- IPL 2022 : राणा – रसेलच्या खेळीने कोलकाता सुसाट! सनरायझर्सपुढे १७६ धावांचे लक्ष्य


