Share

“सत्तेपुढे शिवसेनेचे हिंदुत्व गौण”, राष्ट्रवादीच्या ‘त्या’ निर्णयावरून केशव उपाध्येंचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत मोठी भुमिक घेतली आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. तर यालाच प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या  प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज (१६ एप्रिल) संध्याकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी थेट शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका केली आहे.

“सत्तेपुढे शिवसेनेचे हिंदुत्व गौण. नुसत्याच हिंदुत्वाच्या गप्पा मारायचा, मात्र उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसने हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी घेणार असं जाहीर करूनही त्यावर मुख्यमंत्री, शिवसेना गपगुमान आहे. कारण सत्ता महत्त्वाची आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर असे कधीच झाले नसते.”, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या रोजा इफ्तारचे आयोजन केले आहे.  ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  त्यामुळे मनसेच्या भूमिकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!