🕒 1 min read
मुंबई: दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू केला आहे. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेठ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकानावरील पाट्या मराठीतच लावाव्या लागणार आहेत. यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणूस आठवतो हा जुना इतिहास आहे. BMC ने मुंबईतल्या दुकानांवर मराठी पाट्यांची सक्तीचा आदेश दिला आहे, २५ वर्षानंतर शिवसेनेने मराठी भाषेला जन्म दिला कारण २५ वर्ष मराठी माणसाच्या नावावर मुंबई लुटली आता फक्त पाट्या घ्या आणि खुश व्हा.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
दरम्यान राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या सरसकट मराठी भाषेत असतील. शिवाय, मराठी-देवनागरी लिपीतील अक्षरेही इंग्रजी किंवा अन्य भाषेपेक्षा लहान असणार नाहीत असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“किरीटजी पत्रकार परिषदेतून पळून गेले, देशद्रोही…”, संजय राऊतांचे टीकास्त्र
“मोदींनी देश उद्ध्वस्त…”, महागाईवरून नाना पटोलेंचे टीकास्त्र
“कोरोनाची लाट पुन्हा येऊ नये, यासाठी…”, अजित पवारांचे सूचक वक्तव्य
“तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा”?; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
कोरोनाच्या “या” नव्या व्हेरिएंटबाबत चिंता करायची गरज नाही – राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
