Share

“मोदींनी देश उद्ध्वस्त…”, महागाईवरून नाना पटोलेंचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मोदींनी देश उद्ध्वस्त केला आहे. महागाई, रोजगार, अर्थव्यवस्था जनतेला मिळाले. पाकिटमार मोदी सरकार’, असे पटोले म्हणाले आहेत.

दरम्यान, यापूर्वी ‘मोदी सरकारकडून इंधन दरवाढीतून गोरगरीबांची लूट सुरुच! आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी ८० पैशांच्या वाढीसह दोन आठवड्यात इंधनात ९.२० रुपयांची दरवाढ. पाकिटमार भाजपा सरकार’’, असे म्हणत नाना पटोलेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!