🕒 1 min read
मुंबई : आज (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना संदर्भात सूचक वक्तव्य केले.
यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘आज आपण निरोगी महाराष्ट्रचा संकल्प करत आहोत. कोरोनामध्ये हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्त्वाचे आहे हे जगाला कळलंय. अलीकडच्या काळात लोकांच्या सवयी बदलल्या आहेत. आज सुद्धा मुंबईत काही रुग्ण आढळले आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी मास्क ऐच्छिक केला, तरी देखील आपण काळजी घेऊन मास्क घातला पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनाची पहिली व दुसरी लाट आपण पाहिली आहे. ही लाट पुन्हा येऊ नये, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे’, असे पवार म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या “या” नव्या व्हेरिएंटबाबत चिंता करायची गरज नाही – राजेश टोपे
- “असल्या वैचारिक लबाडीमुळेच काँग्रेस…”, भातखळकरांचा हल्लाबोल
- राज ठाकरेंनी भूमिका बदलू नये.. मोरे, बाबर यांच्यापेक्षा हिंदुत्व महत्वाचं’ – आनंद दवे
- “माझ्या पुतण्याला वाचवा” अश्या आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या; ‘मनसे’चा पवारांवर निशाणा
- “मविआ सरकारने संजय राऊतांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून…”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
