Share

“किरीटजी पत्रकार परिषदेतून पळून गेले, देशद्रोही…”, संजय राऊतांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांत प्रकरणाबाबत मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप राऊत यांनी केला आहे. यावरच आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या उत्तर न देताच निघून गेले.

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “किरीटजी पैसे काय केले? उत्तर नाही. पत्रकार परिषदेतून पळून गेले. देशद्रोही, निर्लज्ज माणूस.”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (६ एप्रिल) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा नवीन लढा सुरू झाला आहे आणि त्यासाठी आम्ही बलिदान देण्यास तयार आहोत असे म्हटले. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या:

“कोरोनाची लाट पुन्हा येऊ नये, यासाठी…”, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

“तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा”?; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

कोरोनाच्या “या” नव्या व्हेरिएंटबाबत चिंता करायची गरज नाही – राजेश टोपे

राज ठाकरेंनी भूमिका बदलू नये.. मोरे, बाबर यांच्यापेक्षा हिंदुत्व महत्वाचं’ – आनंद दवे

“किणी खून प्रकरणात बाळासाहेबांना कुठे-कुठे जावे लागले हे…”, जितेंद्र आव्हाडांचे ‘मनसे’ला प्रत्युत्तर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!