मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात घट झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एकीकडे असे असतांनाच दुसरीकडे कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. दरम्यान, यासंदर्भात आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंट संदर्भात बोलत असतांना राजेश टोपे म्हणाले की,‘या नव्या व्हेरिएंटबाबत चिंता करायची गरज नाही, नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी कडूनही कुठल्याही प्रकारचे कन्फर्मेशन या संदर्भात मिळालेले नाही.’ तसेच एक्स ई असेल किंवा कोणताही व्हेरिएंट असेल, त्याचा जरी आपण अभ्यास केला तरी तो १० ते १५ टक्के जास्त सांसर्गिक आहे, मात्र अद्याप यासंदर्भात कुठलीही माहिती मिळालेली नाही, असेही टोपे म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- “अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार…”, महागाईवरून महेश तपासेंचे टीकास्त्र
- “असल्या वैचारिक लबाडीमुळेच काँग्रेस…”, भातखळकरांचा हल्लाबोल
- राज ठाकरेंनी भूमिका बदलू नये.. मोरे, बाबर यांच्यापेक्षा हिंदुत्व महत्वाचं’ – आनंद दवे
- “माझ्या पुतण्याला वाचवा” अश्या आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या; ‘मनसे’चा पवारांवर निशाणा
- “मविआ सरकारने संजय राऊतांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून…”, भातखळकरांचे टीकास्त्र


