नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. म्हणाले, “मांडीला मांडी लावून बसणाऱ्या माणसाने लिलाव मांडला. त्यातून काही कोटी रुपये जमा केले. त्याचे पुरावे समोर आले आणि तुम्ही म्हणता पुरावे कुठे आहेत? राऊत काहीही बोलतात असं म्हणता? अरे तुम्ही काय बोलता? काल त्यांचं विधान होतं नखं कापून शहीद होता येत नाही. तुम्ही काय Xपटलं. तुम्ही काय कापलं सांगा”? असा सवाल थेट फडणवीसांना केला.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत असताना फडनविसांना या देशासाठी तुमचं काय बलिदान आणि योगदान आहे? उलट ज्यांचं योगदान आहे, त्या बलिदानाचा लिलाव करता या महाराष्ट्रात? असे थेट सवाल करत टीका केली.
पुढे म्हणाले, “कधी राम मंदिराच्या नावाने तर कधी गंगाजल विकून पैसे गोळा केले. आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान आहे. त्याचा लिलाव करता आणि त्या भ्रष्ट गुन्हेगाराचाी बाजू घेता? तुम्ही नेहमी अभ्यास करून बोलता असा दावा करता मग तुमच्याकडे असा काय पुरावा आहे की भ्रष्टाचार झाला नाही? आम्ही सांगतो तो पुरावा नाही का? तुमचंच राजभवन आहे. आमचे नाही. तिथे तुमचेच आदेश पाळले जातात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या –
Kisan Credit Card वर व्याज आकारले जाणार नाही? केंद्राने मांडली भूमिका
“राऊत साहेब बलिदान नको, भ्रष्टाचार थांबवा”, सदाभाऊंचा टोला
“मलिकांच्या अटकेनंतर मोदींना भेटण्याची तत्परता का नाही?”, इम्तियाज जलील यांचा शरद पवारांना सवाल
“असल्या वैचारिक लबाडीमुळेच काँग्रेस…”, भातखळकरांचा हल्लाबोल
“अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार…”, महागाईवरून महेश तपासेंचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

