Share

कोहलीसोबतच्या विनोदावर बोलताना प्रदीप सांगवानने सांगितले की, ” विराट रडला आणि रात्रभर…”

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली अलीकडच्या काळात खराब फॉर्ममध्ये आहे. विराटने नोव्हेंबर २०१९ पासून कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलेले नाही. मात्र त्याची कठीण प्रसंगांना तोंड देण्याची ही पहिलीच वेळ नाही. कोहलीच्या दिल्ली संघाचा माजी सहकारी प्रदीप सांगवान याने एक जुना किस्सा सांगितला आहे. एका विनोदामुळे विराट कोहली कसा रडला आणि रात्रभर झोपलाही नाही, असे प्रदीपने सांगितले आहे.

माजी भारतीय कर्णधार विराट कोहली गेल्या दशकातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. या धडाकेबाज फलंदाजाने २००८ मध्ये राष्ट्रीय संघासाठी पदार्पण केले आणि तीनही फॉरमॅटमध्ये ७० शतकांसह २३,००० हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहली जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारताच्या २०११ विश्वचषक आणि २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयांचा देखील विराट एक भाग आहे.

गुजरात टायटन्सचा खेळाडू प्रदीप संगवानने विराट कोहलीशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगितला आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा कोहली आणि सांगवान हे दिल्ली अंडर-१७ संघाचे सहकारी होते. त्यांच्या प्रशिक्षकाने विराटसोबत विनोद करण्याची योजना आखली. प्रदीपने न्यूज24 शी बोलताना सांगितले की, ‘आम्ही पंजाबमध्ये अंडर-१७ सामने खेळत होतो. कोहलीला गेल्या २-३ डावात मोठी धावसंख्या करता आली नव्हती. आमचे प्रशिक्षक तेव्हाचे अजित चौधरी विराटला ‘चीकू’ म्हणायचे.

प्रदीप सांगवान पुढे म्हणाला, ‘विराट आमच्या संघाचा मुख्य खेळाडू होता आणि अजित सरांनी गंमतीने सुचवले की, विराटला सांगूया की तो पुढच्या सामन्यात खेळणार नाही. आम्ही सर्वजण या गमतीमध्ये सहभागी झालो. अजित सरांनी संघाच्या बैठकीमध्ये विराटच्या नावाची घोषणा केली नाही. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला आणि रडू लागला. विराट सरांना फोन करून सांगितले की, मी २०० आणि २५० धावा केल्या आहेत. खरे सांगायचे तर त्या मोसमात त्याने मोठी धावसंख्या केली होती पण हो शेवटच्या २-३ डावात त्याला संघर्ष करावा लागला होता. तो इतका भावूक झाला की त्याने राजकुमार सरांना (विराटचे बालपणीचे प्रशिक्षक) फोनही केला.

पूर्णपणे अस्वस्थ झालेल्या विराट दिल्लीच्या या वेगवान गोलंदाजाकडे आला आणि त्याला त्याच्या कमतरतांबद्दल विचारले. यानंतर विराटने सांगितले की, यामुळे त्याला रात्रभर झोप लागली नाही. सांगवान म्हणाला, ‘मग तो माझ्याकडे आला आणि विचारला, ‘सांग ना काय झालं? या मोसमात मी इतक्या धावा केल्या आहेत.’ यावर मी त्याला म्हणालो, ‘हो हो, ते खूप चुकीचं आहे!’. तो रात्रभर झोपल नाही. तो म्हणाला, ‘नाही, मला झोपायचं नाहीये. मी खेळत नाही मग झोपून काय करू ?’ मग, मी त्याला सांगितले की तो पुढच्या सामन्यात खेळत आहे. हा सगळा गमतीचा भाग होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!