Share

Mohan Bhagwat | ‘वर्ण आणि जातीव्यवस्थेचा त्याग केला पाहिजे’ म्हणत मोहन भागवत यांनी केलं मोठं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विदर्भ संशोधन मंडळाच्या विद्यमाने वज्रसूची टंक या डॉ. मदन कुलकर्णी आणि डॉक्टर रेणुका बोखारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वर्ण आणि जातीव्यवस्थेवरून एक वक्तव्य केलं आहे.

मोहन भागवत यांचं वक्तव्य –

वर्ण आणि जातीच्या आवश्यकते बद्दल आज कोणी विचारलं तर समाजहित पाहणारा प्रत्येक व्यक्ती तो भूतकाळ होता हेच म्हणेल. तसेच हा भूतकाळ विसरून जा, कुठल्याही प्रकारचा डिस्क्रिमिनेशन मान्य नाही. असं मोहन भागवत म्हणाले.

मधल्या काळात दुर्दैवाने आपण धर्म सोडला, त्याचे पापक्षालन होणे गरजेचे आहे. तो काळ गेला आता संविधानानेही काही बाबी निश्चित केल्या आहेत. आपल्या लोकशाहीमध्ये अनेक गोष्टींची चर्चा होणं आवश्यक असून दोन्ही पक्ष जाणून घेणे आवश्यक आहे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.

आपल्या शास्त्रांना सामाजिक विषमतेला ते मान्य नाही उच्च कर्म असलेला शूद्र ही श्रेष्ठ आहे आणि निच कर्म असलेला ब्राह्मण ही श्रेष्ठ नाही, जेनेटिक्स असं सांगतात की 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह होत होते त्यानंतर ते बंद होऊ लागले. गुप्त काळातही ते झाले असं म्हणत भागवत यांनी आंतरजातीय विवाहचं समर्थन केलं असल्याचं म्हटलं जात आहे.

कोणताही पंथ कोणतेही विचार पार्टी सत्तेमध्ये बराच काळ राहिले की त्याचे शत्रू निर्माण होतात त्याला इन्कंबंसी असं म्हणतात आपल्या देशात ही तसं झाला असून त्याला स्वीकारायला आपल्याला हरकत नाही, आपल्या पूर्वजांनी चूक केली त्याला मानलं हवं कारण सर्वांचेच पूर्वज चुका करतात असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्वार्थ आणि द्वेषाच्या जोरावर समाजातील विविध घटकांमध्ये अंतर आणि वैर निर्माण करण्याचे काम स्वतंत्र भारतातही सुरू आहे. त्यांच्या भानगडीत न पडता, त्यांची भाषा, पंथ, प्रांत, नीती काहीही असो, त्यांच्याशी निर्दयीपणे वागून त्यांचा निर्दयपणे विरोध केला पाहिजे आणि प्रतिकार केला पाहिजे, असं भागवत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!