Share

NANA PATOLE । “तुम्हाला जन्मदात्त्यांबद्दल अभिमान नाही, ही कुठली संस्कृती?”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी पुण्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे पुणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे.

एकवेळ आई-वडिलांना शिव्या द्या, चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं  आहे. आयोजित कार्यक्रमामध्ये ते भाषण करत होते. त्यावेळी त्यांनी हे सांगितलं आहे. पाटलांच्या या दाव्यामुळे अनेक चर्चा होत आहेत. चंद्रकांत पाटलांना आपल्या आई वडिलांना शिव्या दिल्या तर चालेल. पण मोदी शहा यांना त्रास दिलेला चालणार नाही म्हणजे ही कुठली संस्कृती? जन्मदात्याबद्दल अभिमान असला पाहिजे. त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी मुलांवर असते. पण चंद्रकांतदादा बोलले ती कोणती हिंदू संस्कृती?, असा सवाल पटोलेंनी केला आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली आहे. भाजप सर्वकाही स्वार्थासाठी करत असल्याचा आरोप पटोलेंनी यावेळी केलायं. रुपयाची किंमत कागदाबरोबर होत चालली आहे. सत्तेसाठी कायपण हे सध्या भाजपचं गणित आहे. दिल्लीच्या तक्तावर शरणागती जाणाऱ्यांना महाराष्ट्र कधी मान्य करणार नाही, असा शाब्दिक हल्लाबोल नाना पटोलेंनी केला.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर पटोलेंनी टीकास्त्र सोडले आहेत. या सरकारचे 100 दिवस पूर्ण झालेत. राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचं काम हे सरकार करत असल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचे काम केलं जातंय. भ्रष्टाचार, भय आणि भूक देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केला. लोकांचा कल भाजपाच्या विरोधात आहे. महाराष्ट्रातील वेदांतासारखे मोठे प्रकल्प गुजरातला देण्याचे काम या सरकारने केलंय. जनता यांना माफ करणार नाही, असंही पटोले म्हणालेत.

काय म्हणालेत चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटलांनी सांगितले की, परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि राजू शेट्टी यांची झाली. भेट झाल्यानंतर शेट्टी म्हणाले की दादांनी (चंद्रकांत पाटील) मला संपवलं. ते केंद्रीय नेते 40 वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले की, दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही. नशीब पाडला. बाकी काही करायचा त्याचा स्वभाव नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!