टीम महाराष्ट्र देशा: बराच वेळ आपण ट्रेनमध्ये प्रवास करत असताना आपल्याला माहीत नसत आपण कुठे आहोत. त्यावेळी आपण प्ले स्टोअरला जाऊन कुठले तरी ट्रेनचे अप्लिकेशन डाऊनलोड करतो आणि त्यावर सगळी माहिती बघतो. त्याचबरोबर आपल्याला ट्रेन संबंधित PRN, ट्रेन स्टेटस, ट्रेनच्या वेळा इत्यादी माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरावे लागतात. आता तुम्हाला ट्रेन संबंधित माहिती मिळवण्यासाठी कोणतेही ॲडिशनल ॲप्लिकेशन डाउनलोड करायची गरज नाही. कारण आता IRCTC त्यांच्या प्रवाशांना Whatapp (व्हाट्सअप वर सर्व अपडेट्स मिळवून देणार आहे. प्रवाशांना आता एका टॅपवर सर्व माहिती त्यांच्या व्हाट्सअप वर उपलब्ध होऊ शकते. चला, जाणून घेऊया त्याबद्दल:
Whatapp वर तपासा ट्रेन अपडेट
आपल्या व्हाट्सअपच्या चॅटबॉट द्वारे रेल्वे प्रवासी आता ट्रेन बद्दल सर्व माहिती मिळवू शकतात. यामध्ये तुम्ही PRN स्टेटस, लाईव्ह ट्रेन स्टेटस इत्यादी गोष्टी तपास शकतात. यासाठी तुम्हाला व्हाट्सअप चॅटबॉट मध्ये 10 अंकी PRN नंबर टाईप करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला संबंधित सर्व माहिती मिळेल. रेल्वे प्रवासी ट्रेन बद्दल माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या मोबाईल वरून रेल्वे हेल्पलाइन नंबर 139 ला कॉल करून अधिक माहिती मिळू शकतात.
व्हाट्सअप वर मिळवा ट्रेनबद्दल अधिक माहिती
व्हाट्सअप वर ट्रेन बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील गोष्टी फॉलो करा :
- सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोन मध्ये 9881193322 हा Railofi चा व्हाट्सअप चॅटबॉट नंबर सेव्ह करावा लागेल.
- यानंतर व्हाट्सअप अपडेट करून व्हाट्सअप ओपन करा.
- नंतर, Railofi ची चॅट विंडो ओपन करा.
- त्यानंतर चॅटमध्ये 10 अंकी PRN नंबर टाकून व्हाट्सअप चॅटवर पाठवा.
- त्यानंतर Railofi Chatbot व्दारे तुम्हाला तुमच्या ट्रेन संबंधित माहिती पाठवली जाईल.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात काळ्या पैश्यांचा पाऊस? हायकोर्टात मनी लाँड्रींगची याचिका दाखल; ईडी करणार का चौकशी?
- Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचा जोर कायम,तर मुंबईमध्ये आज ‘येलो अलर्ट’
- Nana Patole | “100 दिवसांत ‘ईडी’ सरकारने केवळ…”; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्ला
- Nashik Accident | नरेंद्र मोदींकडून आर्थिक मदतीचा हात; एकनाथ शिंदेकडून ‘इतक्या’ लाखांची मदत तर अमित शहा म्हणाले…
- BJP । “तुझं मुंडकं धडापासून…”; भाजप आमदाराला PFI कडून धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

