Share

Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचा जोर कायम,तर मुंबईमध्ये आज ‘येलो अलर्ट’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी पावसाने राज्यात थैमान घातले होते. आणि पुढेही काही दिवस राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाची धुमाकूळ सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई, पुण्यासह राज्यात इतर ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज 8 ऑक्टोबर रोजी मुंबई शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई शहरामध्ये आज हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’ जारी केला गेला आहे.

पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

आज 8 ऑक्टोबर रोजी राज्यात दिवसभर पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर हवामान खात्याने मुंबईमध्ये आज येल्लो अलर्ट जारी केला आहे. तर पुढील काही दिवस मुंबई, पुण्यासह राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहणार असून 11 ते 12 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईमध्ये येलो अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईमध्ये पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आज येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान 10 ऑक्टोबर नंतर मॉन्सून निघून जाईल आणि पाऊस थोड्या प्रमाणात थांबेल असं हवामान विभागाच्या अंदाजात वर्तवण्यात आले आहे.

राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटनसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!