Share

Jayant Patil | मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नागपूरमध्ये काल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्राम्हण समाजाबाबत एक वक्तव्य केलं. सध्या भागवतांचं ते विधान चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी भाष्य केलं आहे.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भागवतांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

निवडणुका जवळ आल्या, की अशी काही विधानं करणं आणि त्या वर्गाला चुचकारणं असं धोरण काही लोकांचं असू शकतं, असं म्हणत जयंत पाटील यांनी मोहन भागवत यांना चांगलच फटकारलं आहे. जयंत पाटील यांनी पत्रकांरांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलले. पुढे बोलताना पाटील असंही म्हणाले की, या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री आहे की मोहन भागवत भाजपच्या नेत्यांना यासंदर्भात लोकांना विश्वास वाटेल, अशी काही पावलं टाकायला सुचवतील. यातून ते जे भाष्य करतायत, त्याची अंमलबजावणी होऊ शकेल.

मोहन भागवत यांचे वक्तव्य

आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली, असं म्हणत ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवं, असं मोहन भागवत यांनी म्हटलं.

आनंद दवे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, इथला हिंदू नराधमांच्या हाती देण्याचं पाप तुम्ही करत आहात. तुम्हीच पापक्षालन केलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात नाही तर भारतात जातीवाद वाढवत आहात. पापक्षालन करण्याची गरज तुम्हाला आहे. आतापर्यंत हिंदुत्वाचा जागर केला आणि आता मशिदीत मौलवींना भेटायला जात आहात. म्हणून आता पापक्षालन तुम्हीच करायला हवं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!