Share

Shahaji Bapu Patil : ‘मी शिवसेनेचा आमदार आहे, भगवा माझा’; शहाजी बापू पाटलांचा थेट उध्दव ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सांगोल्याचे एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटलांच नाव अख्ख्या महाराष्ट्राला तोंड पाठ झालंय. काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेमंधी हाय, या वाक्यानंतर ते महाराष्ट्रभर व्हायरल झाले आहेत. या डायलॉग ने सोशल मीडियावर तर पोस्टचा धुमाकूळ घातला होता. प्रत्येकजण या डायलॉग चा आनंद लुटताना दिसत होता. हा डायलॉग इतका व्हायरल झाला, की यावर गाणंही बनलं आहे. शहाजी पाटलांच्या या गुणाचं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील कौतुक केलं होतं. आता राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर शहाजी बापू पाटील हे पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात परतले. यावेळी त्यांचे मोठे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना शहाजी बापू पाटलांनी थेट माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवरच निशाणा साधला.

शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारले आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले. राज्यात महविकास आघाडीचे सरकार गेले आणि शिंदे सरकार स्थापन झाले. शिंदे-भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काल विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता सगळे बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील सुद्धा आपल्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी भाषणात शहाजीबापूंनी तुफान डायलॉगबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एवढंच नाही तर मी शिवसेनेचा आहे. भगवा माझा आहे असंही शहाजी बापू म्हणाले. शहाजी बापूंच्या या विधानांने चर्चांना उधाण आले आहे.

उध्दव ठाकरेंवर केली टीका
अडीच वर्षात उद्धव ठाकरेंसोबत केवळ २ वेळा भेट झाली. ठाकरेंनी एकदाही विकासकामांची विचारणा केली नाही, असा अरोप पाटील यांनी केला. करोना काळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे घरात बसत होते. मात्र, अजित पवार आढावा घेण्यासाठी सकाळी सहा वाजता बाहेर पडायचे. एवढचं नाही माझ्यासमोर भारतातील लष्कर जरी उभे केले, तरी माझ्यावर दबाब पडणार नाही, असंही मी एकनाथ शिंदेंना सांगितलं असल्याचे शहाजी बापू पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!