Share

Shivsena : आणखी एका एकनाथ शिंदे समर्थकाची शिवसेनेतून हकालपट्टी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ३९ शिवसेना आमदार गेले. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांची बंडाळी चालू असतानाच उद्धव ठाकरे यांनी “ज्यांना जायचे त्यांनी आत्ताच जा” असा इशारा दिला होता. शिवसेनेतच दोन गट झाले होते. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. तर उद्धव ठाकरे यांची खरी शिवसेना असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता स्थानिक पातळीवर देखील दोन गट पडले आहेत.

शिवसेनेच्या गडचिरोली समन्वयक पदावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानसपुत्र किरण पांडव यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडादरम्यान किरण पांडव हे त्यांच्यासोबतच सुरत आणि गुवाहाटी मध्ये होते. किरण पांडव हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

सत्तेच्या हव्यासापोटी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने अनेक जण जात असल्याचे दिसत आहे. फक्त आमदारच नाही तर पक्षामध्ये सतत कार्यरत असणाऱ्या आणि अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये देखील अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं समर्थन करणाऱ्या अनेकांना शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेलेल्या ३९ आमदारांपैकी १६ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्यावरची निलंबनाची कारवाई अजूनही प्रलंबित आहे. ११ जुलैला या संदर्भातला निर्णय होणार आहे. न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला तर त्यांची आमदारकी देखील रद्द होऊ शकते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केल्यामुळे त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. नंतर ही कारवाई मागे घेतली असल्याचे सांगण्यात आलं. मात्र आता शिवसेनेविरोधात उघड भूमिका घेताना काही नेते दिसत आहेत. यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!