Share

मोठा अपघात! पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या दिंडीत घुसली जीप; १४ वारकरी जखमी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यभरातून अनेक वारकरी पांडुरंगाच्या भेटीला पायी निघाले आहेत. अनेक देवस्थानच्या पाई वारीच्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. या पायी वारीच्या दिंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वारकरी सहभागी होतात. यामध्ये पुरुष व महिला तसेच तरुण वर्गाचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकाऱ्यांच्या दिंडीमध्ये जीप घुसल्याने अपघात झाला आहे. या अपघातात १४ वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या राज्यभारातील वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या ओढीने पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघाले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ज्याप्रमाणे पंढरपुराकडे मार्गस्थ होतो. त्याप्रमाणेच राज्यभरातील अनेक गावांमधून छोट्या छोट्या दिंड्या जात असतात.

पंढरपूरला अशीच एक पायी दिंडीवारी जात असताना मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरील केरेवाडी फाट्याजवळ वारकरच्या दिंडीत पिकअप जीप घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात झाला असून यामध्ये जवळपास १४ वारकरी जखमी झाले आहेत.

अपघातानंतर जखमींना मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर या घटनेनंतर जीप ड्रायव्हर पळून गेला आहे.

पायी दिंड्यांचे अनेक ठिकाणी अपघात होतात
राज्यात दरवर्षी आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात वारकरी पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जात असतात. या वारीदरम्यान अनेक अपघात घडल्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्याची मागणी ही वारकरी संप्रदायाकडून केली जात आहे. कारण अनेक घटनांमध्ये या वारकऱ्यांची कोणतीही चूक नसते. पारगाव धावणाऱ्या वाहनांचा तोल सुटल्याने असे अपघात घडतात.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!