Share

Shahajibapu Patil : शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीने घेतला ‘एकदम ओके मदी’ उखाणा

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वर आपण एक डायलॉग ऐकतोय “काय झाडी , काय डोंगर  काय हाटेल , सगळं एकदम ओके मदी हाय” हा डायलॉग प्रचंड व्हायरल होतोय. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा हा डायलॉग आहे. शहाजी बापू पाटील हे बंडखोर आमदारांसोबत आसाम मधील गुवाहाटीला गेले होते. यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्यासोबत फोनवर बोलत असताना गुवाहाटी मधल्या स्थितीचं वर्णन “काय झाडी , काय डोंगर , काय हाटेल सगळं एकदम ओके मदी होय” अशा शब्दात केलं होतं.

त्यांचा हा ऑडिओ कॉल प्रचंड व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू होती. ३ आणि ४ जुलैला विधानसभेत विशेष दोन दिवसीय अधिवेशन पार पडलं. यानंतर शहाजीबापू पाटील १५ दिवसानंतर आपल्या मतदारसंघात परत आले आहेत. यावेळी त्यांचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत देखील करण्यात आलं.

यावेळी त्यांच्या पत्नी रेखाताई पाटील यांनी शहाजीबापू पाटील यांच्यासाठी एक उखाणा घेतलाय. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. उखाणा घेताना त्या म्हणाल्या की “असेल तिथे मुलीने नम्रतेने वागावे , शहाजी बापू सारखे पती मिळाल्यावर देवाजवळ आणखी काय मागावे” हा त्यांचा ओके मध्ये घेतलेला उखाणा सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

दुसरीकडे, शहाजीबापू पाटलांनी मतदारसंघात गेल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मी माझ्या तालुक्यात आलो आहे. माझ्या तालुक्यातील तमाम जनतेनं एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला भरभरून पाठिंबा दिला आहे. हे जमलेल्या गर्दीवरून लक्षात येत असेल. हा वैचारिक तालुका आहे. गेल्या ५०-६० वर्षांपासून या तालुक्याचं नेतृत्व वैचारिक विचारातून झालं आहे. ही जी भूमिका आहे, ती व्यक्तीगत माझी शहाजीबापू पाटलांची भूमिका नाही, ही माझ्या सांगोला तालुक्यातील जनतेची भूमिका आहे. आम्हाला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पाहिजे होते. ते आता मुख्यमंत्री झालेत, त्यामुळे मी आनंदी आहे.” असंही ते म्हणाले.

दरम्यान, आमदार शहाजी पाटील यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या विधानसभेतील भाषणाचा ‘काय तो आवेश..काय ती जळजळ.. काय ती रडारड…काय ते वाकडं उभा राहणं…OK आहे सगळं…’ असं म्हणत समाचार घेतला होता. शहाजीबापू पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून हे उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भास्कर जाधव विधानसभेचा संजय राऊत झाला होता आज. काय ते आवेशात भाषण… काय ती जळजळ, काय ती रडारड… काय ते वाकडं उभं राहणं… OK आहे सगळं.. असे म्हणून त्यांनी जाधवांवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!