Share

Shinde Government : पावसाळ्यात नागरिक, महिलांची फरपट होऊ नये म्हणून शिंदे सरकारचा प्लॅन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी मागील दोन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तर कित्येक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे मुंबईसह उपनगर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पावसाळ्यातील समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी मुंबईबरोबरच संपूर्ण राज्यातील अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मोठ्या प्रमाणात पाणी साचणाऱ्या २५ ठिकाणांचीही सविस्तर माहिती घेतली.

पावसाळ्यात समस्या निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वेची सुविधा बंद पडते. त्यामुळे नागरिकांना कामावर जाण्यास मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यांना कामावर जाण्यास व कामावरून घरी पोहोचण्यास या दिवसांत बेस्ट आणि एसटी महामंडळाला सांगून बसची उपायोजना करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

बेस्ट व एसटीची सोय केली जाणार
पावसाळ्याच्या दिवसात मुंबईकरांना प्रवासाचा मोठा फटका बसतो. पावसाचे पाणी रस्ते आणि रुळावर येत असल्याने अनेकांना कामावरून घरी जाताना हाल सोसावे लागतात. त्यामध्ये महिलांचे मोठ हाल होत असल्याने त्यांच्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात ज्या ठिकाणी रेल्वेचा खोळंबा होईल त्या ठिकाणापासून बेस्ट आणि एसटीची सोय करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली परिस्थितीची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यातील पावसाच्या परिस्थितीचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील पावसाची परिस्थिती, पूरस्थिती काय आहे. कोणत्या भागात किती पाऊस झाला आहे आणि नद्यांच्या पाण्याची पातळीची परिस्थिती काय आहे, याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!