Share

ENG vs IND : ‘‘आम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये…”, भारताला हरवल्यानंतर बेन स्टोक्स काय म्हणाला?

Published On: 

मुंबई : भारताविरुद्धच्या (ENG vs IND) पाचव्या कसोटीत इंग्लंडच्या विजयामुळे यजमान कर्णधार बेन स्टोक्स खूपच खूश आहे. संघाच्या कामगिरीबाबत त्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इंग्लंडच्या विजयाचे श्रेय जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांना दिले आहे. इंग्लंडने या कसोटीत भारताचा ७ विकेटने पराभव करून इतिहास रचला. यजमानांनी ३७८ धावांचे मोठे लक्ष्यही पार केले. इंग्लंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे.

बेन स्टोक्स म्हणाला, ”खेळाडू असे खेळतात, तेव्हा माझे काम सोपे होते. जेव्हा तुमच्याकडे ड्रेसिंग रूममध्ये स्पष्टता असते, तेव्हा लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे होते. ३७८ धावसंख्या पाच आठवड्यांपूर्वी धडकी भरवणारी होती, परंतु आता सर्व काही चांगले आहे. याचे सर्व श्रेय जॉनी आणि रूटला मिळेल, पण बुमराह आणि शमीविरुद्ध सलामीवीरांनी ज्या पद्धतीने नव्या चेंडूने खेळ केला, त्यांनी एक आदर्श घालून दिला.”

स्टोक्स म्हणाला, “इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट कसे खेळले जाते हे पुन्हा प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला माहीत आहे की आम्हाला कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी द्यायची आहे आणि पाठिंबा अविश्वसनीय आहे. आम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये नवा ट्रेंड आणायचा आहे, आम्हाला एक छाप सोडायची आहे.”

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लिश संघ २८४ धावांवर आटोपला. यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात २४५ धावा केल्या. ३७८ धावांचे लक्ष्य पार करून इंग्लंडने सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!