Share

“राज्यसभेच्या मतदानापासून दूर ठेवण्यासाठी…” ; रवी राणांचा ठाकरे सरकारवर आरोप

Published On: 

अमरावती : महाराष्ट्र विधानसभेतील छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे भाव सध्या गगनाला भिडलेले आहेत. या आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात स्पर्धा आहे. त्यांना विविध प्रकारचे प्रोत्साहन दिले जात आहे. १० तारखेला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

राज्यसभेच्या मतदानापासून दूर ठेवण्यासाठी आम्हाला नोटीस देण्यात आली, असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. हनुमान चालिसा प्रकरणात पोलिसांनी राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आणि ८ जुनला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले. राणा यांच्या विरोधात पोलीस आता दोषारोप पत्र देखील दाखल करणार आहेत.

रवी राणा म्हणाले, “१० तारखेला राज्यसभेसाठी निवडणूक आहे आणि बरोबर ८ तारखेला मला हजर राहण्यासाठी नोटीस आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्णपणे पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा वापर करुन घेत आहेत. महाविकास आघाडीला भाजपच्या विरोधात मतदान करावं म्हणून माझ्यावर दबाव आणल्या जात आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!