Share

Milind Narvekar | शिंदे गटात जाणार का?, मिलिंद नार्वेकर म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) देखील शिंद गटात सहभागी होतील, असा दावा शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील केला. त्यानंतर यावर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाष्य केलं. त्यानंतर मिलिंद नार्रेवकर कुठे गायब आहेत?, असा सवालही विचारण्यात येत होता. तर अशातच मिलिंद नार्वेकर यांनी स्वत: एक ट्विट केलं आहे.

काय म्हणाले मिलिंद नार्वेकर ?

मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्यासमवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं असल्याचं, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

परंतू मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कुठेही ते शिंदे गटात जाणार आहेत की नाही,याविषयी बोलले नसल्याचं समजतं आहे.

किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया –

दरम्यान,  मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास नाही. कारण राज ठाकरे, नारायण राणे प्रचंड आरोप केले होते. त्यातूनही ते तावून सलाखून निघाले. आज ते तिरुपती सारख्या आध्यात्मिक संस्थेवर आहेत. त्यांची सद्बुद्धी नेहमीच चांगली असते. मात्र, आता ते शिंदे गटात जाणार की नाही याविषयी मला काहीही माहिती नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!