Share

“मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात कोण संपलंय…”, ‘मनसे’चे खुले आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशात काही लोकांनी मधल्या काळात हिंदुहृदयसम्राट बनण्याचा प्रयत्न केला पण तो लोकांनी झिडकारला. कारण हिंदुहृदयसम्राट म्हटल्यानंतर केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरेंचेच नाव येते. दुसरे कोणी येत नाही आणि असूच शकत नाही. हिंदुहृदयसम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना जो धावून जातो तो हिंदुहृदयसम्राट असतो. असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर निशाणा साधला. ते काल (१० एप्रिल)  पोटनिवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या ऑनलाइन सभेत बोलत होते. यानंतर आता मनसेने उद्धव ठाकरेंना खुले आव्हान दिले आहे.

“शिवसेना संपली” अशी ओरड काँग्रेसने अनेकदा केली, पण बाळासाहेबांनी शिवसेनेला अखेर उभं केलंच. त्यांच्याच परिश्रमाची सत्ताफळं आज मातोश्रीत बसून उद्धव ठाकरे खात आहेत. राहिला प्रश्न मनसेचा; मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात. कोण संपलंय, हे त्यांना कळेल. असे आव्हान मनसे नेते किर्तीकुमार शिंदे (Kirti Kumar Shinde) यांनी दिले आहे.

https://twitter.com/KirtikumrShinde/status/1513079293978431488?t=9B2jHSQD_JSTDKdWNiIlPg&s=08

तुम्हाला जर हिंदुहृदयसम्राट यांच्याबद्दल इतकाच अभिमान असेल तर मध्यंतरी तुम्हीच त्यांच्या नावापुढे नीच ही पदवी लावण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायला विरोध का? समृद्धी महामार्गाला नाव द्यायाला विरोध का? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला.

महत्वाच्या बातम्या:

अनिल परब यांच्या ‘त्या’ निर्णयावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “तुरुंगात असणारे नवाब मलिक…”

“गेली सांगून मवि आघाडी की जनते परीस कुत्रीमांजरी…” , भातखळकरांचा टोला

“कुणीतरी चिथावणी दिल्यामुळे एसटी कर्मचारी…”, शरद पवार यांचा आरोप

“सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात भाजपचे मोठे योगदान”, राऊतांचा गंभीर आरोप

“सामाजिक न्यायाचे चॅम्पियन आणि आशेचा स्रोत…”, नरेंद्र मोदींची महात्मा फुलेंना आदरांजली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!