Share

अनिल परब यांच्या ‘त्या’ निर्णयावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “तुरुंगात असणारे नवाब मलिक…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. त्यानंतर या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०९ आंदोलकांना अटक करण्यात आली होती. तद्पश्चात काल (१० एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या १०९ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला असल्यामुळे त्यांना सेवेत घेणे अशक्य आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) म्हणाले. दरम्यान, अनिल परब यांच्या या निर्णयावर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या १०९ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे त्यांना सेवेत घेणे अशक्य आहे , असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. मात्र फौजदारी गुन्ह्याखाली अटक होऊन तुरुंगात असणारे नवाब मलिक मात्र मंत्रिमंडळात राहू शकतात’, असे खोचक टोला भातखळकरांनी लगावला आहे.

दरम्यान, ‘येत्या २२ तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश असून २२ तारखेपर्यंत जे कामावर रुजू होतील त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जाणार नाही. या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. २२ तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाही तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण करता येईल का याचा विचार केला जाणार आहे. पाच महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस आगाराने सर्व एसटी गाड्याची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे’, असे काल प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अनिल परब म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!