🕒 1 min read
मुंबई: राज्य कोरोना निर्बंधामधून मुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने ज्या मंत्रालयात घेतला, त्याच मंत्रालयात सामान्य माणसाच्या प्रवेशावरील बंधने मात्र आजही कायम आहेत. गृह विभागाने यापूर्वी दोनवेळा ही बंधने हटविण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला, पण तो प्रलंबित आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“राज्य निर्बंधमुक्त झाले असले तरी मंत्रालयात मात्र बंधने कायम आहेत. जनताजनार्दनाला अजूनही मंत्रालयात प्रवेश नाहीच. त्यामुळे कुत्री अन् मांजरांचा सुळसुळाट झाला आहे. गेली सांगून मवि आघाडी की जनते परीस कुत्रीमांजरी बरी.”, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
मंत्री कार्यालयातील कर्मचारी सध्या बाहेरून माणसांना आत आणण्याच्या कामातच व्यग्र असतात. मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांसाठी पास तयार करणे, गेटवर जायचे आणि त्यांना आत आणायचे, यातच त्यांचा वेळ जातो. तसेच मंत्रालयात कुत्री आणि मांजरांचा सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक माळ्यावर त्यांचा मुक्तसंचार असतो. यावरून सरकारवर भाजपकडून टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
“कुणीतरी चिथावणी दिल्यामुळे एसटी कर्मचारी…”, शरद पवार यांचा आरोप
“सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात भाजपचे मोठे योगदान”, राऊतांचा गंभीर आरोप
“सामाजिक न्यायाचे चॅम्पियन आणि आशेचा स्रोत…”, नरेंद्र मोदींची महात्मा फुलेंना आदरांजली
…हा विचार हिंसा करणाऱ्यांच्या डोक्यात का आला नाही?- संजय राऊत
“जो धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये वाद निर्माण करतोय अशा…”, शरद पवारांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
