अमरावती: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. यानंतर शरद पवार यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. ते काल (१० एप्रिल) अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते.
नेतृत्व चुकीचे असले तर त्याची किंमत कामगारांना चुकवावी लागते. एसटी कामगारांबाबत काय घडलं, हे लोकांनी टीव्हीवर पाहिलं. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, सर्वसामान्य एसटी कामगारांना भडकावून चुकीच्या मार्गाला नेले असल्याचे दिसून येते. राजकारणात सार्वजनिक जीवनात काम करताना अनेक प्रकारची संकटे येतात. काही संकटे आयोजित केलेली असतात, काही अचानक परिस्थितीमुळे उद्भवतात. त्यांना न घाबरता तोंड दिले पाहिजे. कालचं संकट हे काही संकट नव्हतंच. कुणीतरी चिथावणी दिल्यामुळे तो प्रसंग घडला. असा आरोप करत त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
तसेच जे एका विचाराचे आहेत, त्यांना सोबत घेऊन सामान्य माणसाचे दुखणे दूर केले पाहिजे. सांप्रदायिक विचार घेऊन माणसांमध्ये अंतर वाढविण्याचे काम कुणी करत असेल तर त्यांच्यासोबत संघर्ष करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पार पाडेल, असा विश्वास मला वाटतो.असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“सामाजिक न्यायाचे चॅम्पियन आणि आशेचा स्रोत…”, नरेंद्र मोदींची महात्मा फुलेंना आदरांजली
…हा विचार हिंसा करणाऱ्यांच्या डोक्यात का आला नाही?- संजय राऊत
“जो धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये वाद निर्माण करतोय अशा…”, शरद पवारांचा इशारा
“महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही”, संजय राऊतांचा हल्लाबोल
“रोजगार वाढविण्यासाठी देशाची सत्ता…”, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

