Share

“सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात भाजपचे मोठे योगदान”, राऊतांचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात भाजपचे मोठे योगदान असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘राज्यात एस.टी. कामगारांचा संप सुरू आहे. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे ही एक मागणी सोडली तर कामगारांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या. कामगारांना मोठा घसघशीत आर्थिक लाभ मिळाला. कामगारांचे नेते संपकऱयांच्या वतीने कोर्टात गेले. तेथेही चपराक मिळाली व ”कामावर हजर व्हा” असे न्यायालयानेही बजावले. ९२ हजार एस.टी. कामगारांपैकी बहुसंख्य कामावर रुजू झाले, पण कोणीएक गुणरत्न सदावर्तेच्या चिथावणीमुळे कामगारांचा एक गट आझाद मैदानावर लढण्याच्या गर्जना करीत बसला होता. यापैकी एक ‘झुंड’ शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचली व त्यांनी दगड, चपला वगैरे फेकून हल्ला केला. सदावर्ते हा माणूस अचानक उपटला व त्याला प्रसिद्धीमाध्यमांतून अकारण मोठेपण दिले गेले.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात विरोधी पक्षाचे योगदान आहे असे स्पष्ट दिसते. विरोधकांना स्वतःला ज्या लढाया लढता येत नाहीत तेथे असे ‘गुणरत्न’ ताब्यात घेऊन त्यांच्या डोक्यात झिंग भरून महाविकास आघाडीच्या विरोधात उभे केले जाते. भाजपने त्यांच्या नव्या गुणरत्नाचे योग्य प्रकारे पालनपोषण केले व भाजपमधील नवहिंदुत्ववादी पुढारी ठाकरे-पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाविषयी ज्या चिथावणीखोर भाषेचा वापर करतात, त्याच मार्गाचा अवलंब गुणरत्नाने केला.’

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!