🕒 1 min read
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मंगळवारी तिसरा टी-२० सामना खेळला गेला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ४७ धावांनी विजय झाला. या खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकाचा पराभव केला. यासह भारताने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत पहिला विजय नोंदवला. भारताने मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावूमाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु पाहुणा संघ केवळ १३१ धावा करून सर्वबाद झाला. भारताकडून हर्षल पटेलने ४ आणि युझवेंद्र चहलने ३ बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून यष्टिरक्षक फलंदाज क्लासेनने सर्वाधिक २९ धावांची खेळी खेळली. चहलला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
दक्षिण आफ्रिकाचा डाव
प्रत्युत्तरात १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. केवळ २३ धावांवरच संघाला पहिला धक्का बसला. कर्णधार बावुमा वैयक्तिक ८ धावांवर आवेश खानच्या हाती अक्षर पटेलकरवी झेलबाद झाला. तर त्यापाठोपाठ हेंड्रिक्स हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर चहलच्या हाती झेलबाद झाला. त्याने २३ धावांची खेळी खेळली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला डुसेन वैयक्तिक १ धावसंख्येवर बाद झाला. यानंतर ड्वेन प्रिटोरियस २० धावा करून बाद झाला. यानंतर मागील सामन्यातील हिरो हेनरिक क्लासेन (२९) आणि वेन पार्नेल (२२) या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. या सामन्यात डेव्हिड मिलर फक्त ३ धावा करून बाद झाला. भारताकडून गोलंदाजीत हर्षल पाटेल आणि युजवेंद्र चहल यांनी दमदार गोलंदाजी केली. हर्षल पटेल ने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर चहलने फिरकी गोलंदाजीची जादू दाखवत ३ गडी बाद केले. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकाचा डाव १३१ धावांवर गारद केला.
भारताचा डाव
भारताकडून प्रथम फलंदाजी सुरुवात करताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांनी दमदार खेळी केली. ऋतुराज गायकवाडने ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत त्याने २ षटकार आणि ६ चौकारांच्या सहाय्याने ५७ धावांची खेळी खेळली. ऋतुराजाचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक होते. भारताला पहिला धक्का गायकवाड यांच्या रूपाने बसला. ५७ च्या वैयक्तिक धावसंख्येवर त्याला महाराजने बाद केले. दुसऱ्या गड्यासाठी १४ धावा करून श्रेयस अय्यर बाद झाला. त्याला शम्सीने झेलबाद केले. इशान किशनने २ षटकार आणि ५ चौकारांच्या सहाय्याने ५४ धावांची दमदार खेळी खेळली. कर्णधार रिषभ पंत (६ धावा) ला काही खास कामगिरी करता आली नाही. यानंतर हार्दिक पांड्या ने शेवटी खेळपट्टीवर टिकून राहत ३१ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिका कडून गोलंदाजी करताना ड्वेन प्रिटोरियसने सर्वाधिक २ बळी घेतले.
#TeamIndia win the 3rd T20I by 48 runs and keep the series alive.
Scorecard – https://t.co/mcqjkCj3Jg #INDvSA @Paytm pic.twitter.com/ZSDSbGgaEE
— BCCI (@BCCI) June 14, 2022
.@yuzi_chahal put on a superb show with the ball and bagged the Player of the Match award for his match-winning bowling display for #TeamIndia in the third T20I. ????????
Scorecard ▶️ https://t.co/mcqjkCj3Jg#INDvSA | @Paytm pic.twitter.com/RcVisMlYdI
— BCCI (@BCCI) June 14, 2022
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील चौथा टी-२० सामना १७ जूनला राजकोट येथे खेळला जाणार आहे. भारताने विशाखापट्टणम येथे खेळायला तिसरा सामना जिंकून मालिकेत २-१ असे पुनरागमन केले आहे. अजूनही भारतासाठी प्रत्येक सामना हा ‘करो या मरो’ स्थितीचा असणार आहे. भारताला ही ५ सामन्यांची टी-२० मालिका जिंकण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. सलग तिसऱ्या सामन्यातही भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणताही बदल केला नव्हता. राजकोट येथील चौथ्या सामन्यातही भारतीय संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
