मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. अयोध्येत ते आज रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी आदित्य ठाकरे शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील. मात्र त्यांच्या दौऱ्यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
“आज एक जुनी गोष्ट आठवली जेंव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेले सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते. काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्या वेळी आस्वाद घेत असतील. फक्त राज साहेबच तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यातला फरकआहे.”, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
आज एक जुनी गोष्ट आठवली जेंव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा पोटनिवडणुकीतआज अयोध्येत असलेल सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते काही जण तर घरी बसूनलॉलीपॉपचा त्या वेळी आस्वाद घेतअसतील फक्तराजसाहेबच तिथे प्रचार करत होते.सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यातला फरकआहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 15, 2022
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेही अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्यांनी आपला दौरा रद्द केला. राज्यातही यावरून बराच गदारोळ झाला होता. आजही बाबरी मशीदचा मुद्दा राजकारणात चर्चिला जात असतो. त्यातच आता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौर्यावरून विरोधक टीका करण्याची एकही संधी न सोडताना दिसून येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “देहू येथील कार्यक्रम सरकारी नाही तर खासगी त्यामुळे…”, अजित पवारांना भाषणाची संधी नाकारल्यानंतर भाजपचे स्पष्टीकरण
- ममता बॅनर्जींंनी घेतली शरद पवारांची भेट, राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा
- ‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतर अक्षय कुमारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- देहूत अजित पवारांना बोलू दिलं नाही! सुप्रिया सुळे म्हणाल्या…
- या सरकारने इंधन आकाराचे पैसे आपल्या सरकारकडुन भरावे, जनतेकडुन घेऊ नये – चंद्रशेखर बावनकुळे


