Share

“देहू येथील कार्यक्रम सरकारी नाही तर खासगी त्यामुळे…”, अजित पवारांना भाषणाची संधी नाकारल्यानंतर भाजपचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे सांगितले. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर आता भाजपने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नकता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची विनंती केली पण त्यांनी नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील राजभवन येथील एकच कार्यक्रम सरकारी होता, तेथे प्रोटोकॉलपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण झाले. (येथे श्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही. हे लक्षात घ्या) असे भाजपने म्हटले आहे.

तसेच नरेंद्र मोदी यांच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपकडून कोणताही आक्रस्ताळेपणा झालेला नाही. कारण, भाजपसाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राच द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत स्वतःचा अहंकार नाही. ही वस्तुस्थिती कळल्यानंतर सुद्धा ज्यांना केवळ गरळ ओकायची आहे. त्यांना महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राची परंपरा याच्याशी काही एक घेणं-देणं नाही. त्यांना केवळ तळ्या उचलायच्या आहेत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गरळ ओकण्यामागे मोदीद्वेष अधिक आहे त्यामुळे त्यांना औषध नाही. असा टोलाही भाजपने लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!