मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे सांगितले. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.
“अजित पवारांना बोलायला संधी मिळाली नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाचे कौतुक करणं त्यांना सुचलं नाही. खासदार सुळे TV फुटेज बघा, हजारो वारकरी या कार्यक्रमाला आले होते त्या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम तुम्ही केले.”, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
उमु. अजित पवारांना बोलायला संधी मिळाली नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाचे कौतुक करणं त्यांना सुचलं नाही. खासदार सुळे TV फुटेज बघा, हजारो वारकरी या कार्यक्रमाला आले होते त्या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम तुम्ही केले.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 15, 2022
दरम्यान देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नकता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची विनंती केली पण त्यांनी नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील राजभवन येथील एकच कार्यक्रम सरकारी होता, तेथे प्रोटोकॉलपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण झाले. (येथे श्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही. हे लक्षात घ्या) असे भाजपने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…त्यावेळी काही जण लॉलीपॉपचा आस्वाद घेत असतील”, अयोध्या दौऱ्यावरून ‘मनसे’चा आदित्य ठाकरेंना टोला
- “देहू येथील कार्यक्रम सरकारी नाही तर खासगी त्यामुळे…”, अजित पवारांना भाषणाची संधी नाकारल्यानंतर भाजपचे स्पष्टीकरण
- ममता बॅनर्जींंनी घेतली शरद पवारांची भेट, राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा
- ‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतर अक्षय कुमारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- देहूत अजित पवारांना बोलू दिलं नाही! सुप्रिया सुळे म्हणाल्या…


