🕒 1 min read
मुंबई : भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे जगभरात पडसाद उमटले. अनेक इस्लामिक देशांनी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला होता. यानंतरच्या काळात सामान्य जनमानसांत या घटनेचे परिणाम पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर अमरावतीतील उमेश कोल्हे यांची काही लोकांकडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर भाजप खासदार नवनीत राणा यांनी माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पालकमंत्र्यांनी आणि सीपींनी घटनेला दाबल्याचा प्रयत्न केल्याचे आरोप नवनीत राणा यांनी केले होते. त्यानंतर आता या आरोपाला उत्तर देताना यशोमती ठाकूर यांनी राणा दांपत्यावर पलटवार केला आहे.
अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे की, राणा दाम्पत्याने उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या प्रकरणाचा इव्हेंट केला, कोल्हेंच्या हत्याचा मास्टरमाइंड हा राणा दांपत्य यांचाच कार्यकर्ता, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केले होते. कॉल यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात फेसबुक पोस्ट केली होती त्यामुळे काही लोकांकडून त्यांचे हत्या करण्यात आली.
यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, राणा दाम्पत्य हे सध्या पब्लिसिटी करण्याच्या जोरावर आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातही राणा दांपत्य चोराच्या उलट्या बोंबा अशी भूमिका घेत आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड हा राणादांपत्य यांचाच कार्यकर्ता आहे. असा आरोपही यावेळी माझी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.
भाजपच्या नेत्यांना पूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला महेश कोल्हे यांनी समर्थन केले होते. त्यांनी फेसबुक वर नुपूर शर्मांच्या समर्थनात पोस्ट लिहिली होती. त्यामुळेच त्यांचे हत्या करण्यात आली. उमेश कोल्हे हे मेडिकल चालवत होते. २१ जून २०२२ ला रात्रीच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असताना त्यांना काही लोकांनी मध्येच गाठले आणि त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
