Share

ENG vs IND : बॅटिंगमध्ये फ्लॉप पण डान्समध्ये टॉप..! विराटनं केलं प्रेक्षकांचं मनोरंजन; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : टीम इंडियाने गेल्या आठवड्यात एजबॅस्टन येथे इंग्लंडकडून (ENG vs IND) पुन्हा नियोजित झालेल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. याच मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडचा ४९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह भारताने तीन टी-२० मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. याआधी रोझ बाउलमध्ये भारताने पहिल्या टी-२० सामन्यामध्ये इंग्लंडचा ५० धावांनी पराभव केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत दोन्ही सामने जिंकले.

टीम इंडियाचे ४ नियमित खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या टी-२० मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले. यापैकी बुमराह, पंत आणि जडेजाने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण, विराट अपयशी ठरला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कोहलीने अवघी एक धाव केली. पदार्पण सामना खेळत असलेल्या रिचर्ड ग्लीसनच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यामुळे एजबॅस्टनवर कोहलीची मोठी खेळी पाहण्यासाठी आलेल्या भारतीय चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. मात्र, क्षेत्ररक्षणादरम्यान कोहलीने चाहत्यांची निराशा दूर केली.

https://twitter.com/MohitShukla1030/status/1545806336985747456?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1545806336985747456%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-virat-kohli-wins-over-edgbaston-crowd-with-his-brilliant-dance-moves-during-india-vs-england-2nd-t20i-watch-video-4380437.html

सामन्यादरम्यान कोहली सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. जेव्हा-जेव्हा त्याला संधी मिळत होती, तेव्हा तो भारतीय चाहत्यांशी बोलत होता. यादरम्यान चाहत्यांनी भांगडा केल्यावर कोहलीनेही मैदानात डान्स करायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोहलीचा मैदानावर डान्स करतानाचा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. असे त्यांनी अनेक प्रसंगी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!