मुंबई : अभिनेता सलमान खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बॉलीवूडमधील बरेच कलाकार त्यांच्या चाहत्यांना भरभरून प्रेम देत असतात. आपल्याला जर एखादा चाहता भेटायला आला तर ते आदराने त्याचे स्वागत करतात. पण सलमान खान या गोष्टीला अपवाद आहे अस म्हणता येईल. सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सलमान खानची त्याच्या चाह्त्यासोबाची वागणूक स्पष्टपणे दिसत आहे.
जाणून घ्या नेमकं प्रकरण –
सलमान खानची चाह्त्यांसोबतची वागणूक हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता देखील सलमान खानने चाह्त्यासोबत केलेल्या वागणुकीवरून सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. मुंबई विमानतळावर सलमानचा चाहता त्याला भेटवस्तू देण्यासाठी फोटो फ्रेम घेऊन आला होता. पण चाहत्याला त्याने चांगली वागणूक दिली नाही. चाहता भेटायला आल्यावरती सलमानच्या चेहऱ्यावर हसू देखील आले नाही. त्याने चाह्त्यासोबत बळच फोटो काढला. नेटकऱ्यांना ही गोष्ट चांगलीच खटकली आहे.
https://www.instagram.com/p/CeRGn4KqL0G/
व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. सलमानखान च्या या वागणुकीमुळे एका युजरने म्हटलं आहे की, तु मला आवडायचास पण यापुढे ते शक्य नाही. तर काही युजर्सने हे वागणं चांगलं नाही अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

