Share

“कोरोनात दोन वर्षे गेल्यानंतरही, राजकारण्यांना काही समजलं नाही” ; बच्चू कडूंची खंत

Published On: 

अकोला : राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या सडेतोड आणि बिनधास्त राजकीय वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मागील काही दिवसांपासून बच्चू कडू अनेकदा माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर टीका केली आहे.

राजकारण्यांना आजही गांभीर्य समजलेले नाही गेली दोन वर्ष आपण कोरोनात काढली आहेत. याकाळात सर्वांची बिकट परिस्थिती झाली होती. ज्यामध्ये लोकांना ऑक्सिजन मिळाले नाही, तर कोणाला बेड मिळाले नाही. तर कोणाला औषध मिळालं नाही. यामध्ये बरेच लोकांच्या हालअपेष्टा झाल्या. काहींना आपला जीव गमवावा लागला. एवढ सर्व भयानक घडल्यानंतरही अजून राजकारण्यांना काही समजलेले नाही.

आपण पाहतो की आज हॉस्पिटल ही सर्वात महत्वाची गरज आहे. हॉस्पिटल हे जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे ते सोडून भोंगा आणि चालीसाचा मुद्दा काही राजकारणी गाजवत आहेत. दोन वर्ष खूप हालअपेष्टा भोगल्या नंतर प्रत्येक पक्षाच्या अजेंड्यावर हॉस्पिटल असायला पाहिजे होती. शाळा असायला पाहिजे होती. कारण कोरोनाच्या काळात चालू होत ते फक्त हॉस्पिटल. त्यामुळे हॉस्पिटल बनविण्याचे सोडून भोंगा आणि हनुमान चालीसाचा मुद्दा उपस्थित करून नागरिकांना भुरळ घालण्याचं काम राजकारणी करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट येथील बीज मोहात्सवाच्या उदघाटन प्रसंगी बच्चू कडू बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!