Share

Maruti Car Update | मारुती सुझुकीच्या ‘या’ दोन SUV पुढच्या वर्षी मार्केट मध्ये धुमाकूळ घालण्यास सुसज्ज

Published On: 

🕒 1 min read

भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी सतत आपल्या नवनवीन कार मार्केट मध्ये लाँच करत असते. आणि पुढेही कंपनीचा हा ट्रेंड असा सुरू राहणार आहे. आताच कंपनीने आपली हायब्रीड SUV ग्रँड विटारा लाँच केली आहे.

पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मारुती आपल्या दोन नवीन गाड्यांसह बाजारामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सुसज्ज आहे. या दोन्ही गाड्या SUV सेगमेंट मध्ये लाँच केल्या जातील. यामध्ये पहिली कार आहे मारुती सुझुकी बलेनो क्रॉस आणि दुसरी आहे मारुती सुझुकी 5 डोअर जिम्नी.

मारुती सुझुकी बलेनो क्रॉस (मारुती Suzuki Baleno Crass )

देशातील ऑटोमोबाईल सेक्टरमधील आघाडीची कंपनी मारुती पुढच्या वर्षी आपली मारुती सुझुकी बलेनो क्रॉस लाँच करणार आहे. ही नवीन गाडी कंपनीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर बेस्ड असणार आहे. या गाडीला BS6 बूस्टर जेट टर्बो पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर ही नवीन SUV माईल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजीसह लाँच करण्यात येणार आहे. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील असू शकतो. मारुती आपल्या नेक्सा डीलरशिपव्दारे ही कार विकण्याचा विचारात आहे.

5 डोअर जिम्नी ( 5 Door Maruti Jimny)

मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन कार बाजारात लाँच करणार आहे. ही कार 5 डोअर कार असेल. ही ऑफ-रोड कार 3850 मिमी लांब असू शकते. यामध्ये 210 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. या SUV मध्ये 1.5L K15C डुअलजेट पेट्रोल इंजन दिले जाऊ शकते जे 103bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क निर्माण करू शकते. या SUV मध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!