🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन सत्ता मिळवली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केल्यामुळे त्यांनी हा बंड केला असल्याचं शिंदेंनी सांगितलं होतं. मात्र, अशोक चव्हाण यांनी केलेल्या दाव्यानंतर शिंदेंच्या या कारणावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. यावर आता अनेक नेते प्रतिक्रिया देत असून भाजप नेते आशिष शेलार यांनी सज्जड दमच दिला आहे.
अशोक चव्हाणांची क्लिप जर जाहीर केली तर ते अडचणीत येतील, मात्र ते मित्र अशल्याने आम्ही असं करणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे. एवढंच नाही तर राजकीय परंपरेनुसार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यबाबत आम्ही काय बोलणार नाही पण राजकीय काही गोष्टी आम्ही सांगू शकतो असं देखील ते यावेळी म्हणाले.
२०१४ मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसला प्रस्ताव आला होता आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवण्यात आलं होतं. मात्र, विशेष बाब म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे देखील होते. त्यावेळी चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं होतं, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता.
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या बोलण्यात काहीच अर्थ नसून एकनाथ शिंदे गेलेही असतील, कारण पक्षाचे नेते सांगतात तेव्हा जावं लागतं आणि शिवसेनेसोबत जा, असं सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांना सांगितल्यावर त्यांनाही जावं लागलं, असी प्रतिक्रिया शिंदे गटाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | “वर्षभरात केवळ १५ सिलिंडर मिळणार?” ; सुप्रिया सुळेंची आक्रमक पोस्ट
- Honda Bike | होंडा देत आहे आपल्या बाइक्सवर खास फेस्टिव्ह ऑफर
- IAS | “… मग उद्या कंडोम देखील मोफत द्यावे लागतील”, महिला आधिकाऱ्याचं संतापजनक वक्तव्य
- Viral Video | ‘ही’ व्यक्ती रबराप्रमाणे वळवते आपले शरीर, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क!
- Ashok Chavan | एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या भूमिकेवर अशोक चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, “२०१४ मध्येच…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
